कपल छत्री, फॅन्सी रेन कॅपचा नवा ट्रेंड

Couple-Umbrella
Couple-Umbrella

चिंचवड - पावसाळ्यात बूट ओले झाले की ते लवकर वाळत नाहीत; 
वर्षाविहाराला जाताना सोबत दोन छत्र्या घ्याव्या लागतात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात हे चित्र बदलले असून, तरुणाई नव्या ट्रेंडकडे वळू लागली आहे. त्यात बुटांचे संरक्षण करण्यासाठी शू-कव्हर, फिरायला जाण्यासाठी अनोख्या पद्धतीची कपल छत्री आणि फॅन्सी रेन कॅप यांचा समावेश होत आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये नवीन ट्रेंड येतात; त्याकडे तरुणाई लगेच आकर्षित होते. यंदाच्या पावसाळ्यात रेन कॅपचा ट्रेंड तरुण-तरुणी आणि लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रेन कॅप ही फोल्डिंग होत असून, हाताळण्यास सोपी आहे. त्यात विविध रंगाच्या डिझाईन मिळत आहेत.

व्यावसायिक अक्षय शहा म्हणाले, ‘‘आजोबांच्या पारंपरिक आकड्याच्या छत्रीपासून ते सप्तरंगी मोठ्या छत्र्यांना यावर्षी विशेष मागणी आहे. त्यात गार्डन छत्री, पिकनिक छत्री, कपल छत्री यांना विविध लेस, फ्रिल असलेल्या या छत्र्या तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत. तर एकत्र वर्षा विहार करण्यासाठी कपल आंब्रेलाला मागणी आहे.’’ रोजच्या प्रवासासाठी फॅन्सी निऑन कलरचे रेनकोट घेण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने वापरता येणारे रेनकोट खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. 

प्रिंटेड वनपीस स्कर्ट-टॉप, पॉचोज यांची तरुणींमध्ये खरेदीची क्रेझ आहे. तर लहान मुलांमध्ये कार्टूनचे रेनकोट व रेन कॅपची क्रेझ दिसून येते. या रेनकोटच्या आत स्कूल बॅग बसेल अशी रचना केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com