डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तावडे आणि भावे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दाबा सीबीआयकडून करण्यात आला आहे. तर डॉ. दाभोलकर यांचा हत्यारा शरद कळसकर याला ऍड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा तर भावे याने दुसऱ्यांदा अर्ज केला होता. न्यायालयाने दोघांचे अर्ज नामंजूर केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दाबा सीबीआयकडून करण्यात आला आहे. तर डॉ. दाभोलकर यांचा हत्यारा शरद कळसकर याला ऍड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे. कळसकर याने पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणातील तपासात दिलेल्या कबुली  जबाबावरून ऍड. पुनाळेकर आणि भावे यांना मे 2019 मध्ये महिन्यात अटक करण्यात आली होती. ऍड. पुनाळेकर यांना जमीन देण्यात आला आहे तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. 3 सप्टेंबर 2016 डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 रोजी कळसकर व अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज करण्याची करण्याचा अधिकार असल्याने त्याने जामीनाचा अर्ज दाखल केला होता,  अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली. 

डॉ. तावडेला वडिलांना भेटण्याची परवानगी :
माझे वडील वृद्ध असून सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे पोलिसांच्या पथकासह मला त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज डॉ. तावडेने न्यायालयात केला होता. हा अर्ज मंजूर करत न्यायालयाने पोलिसांच्या उपस्थितीत वडिलांना भेटण्याची परवानगी डॉ. तावडेला दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court again rejected the bail pleas of Dr.Tawde and Bhave in the Dabholkar murder case