पीडित पत्नीला मिळाला न्यायालयाकडून न्याय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - पतीकडून होणारा छळ तिने मुकाटपणे सहन केला...त्याने तिला मारहाण करून घराबाहेरही काढले...धुण्याभांड्याची कामे करीत ती मुलासह उपजीविका करीत होती...पतीने घटस्फोटाचा दावाही दाखल केला...अखेर न्यायालयातूनच तिला न्याय मिळाला. 

पुणे - पतीकडून होणारा छळ तिने मुकाटपणे सहन केला...त्याने तिला मारहाण करून घराबाहेरही काढले...धुण्याभांड्याची कामे करीत ती मुलासह उपजीविका करीत होती...पतीने घटस्फोटाचा दावाही दाखल केला...अखेर न्यायालयातूनच तिला न्याय मिळाला. 

कौटुंबिक न्यायालयाने एका दाव्यात दिलेल्या निर्णयामुळे या महिलेला दिलासा मिळाला आहे. या महिलेच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती. वडिलांनी कर्ज काढून मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पती तिच्याशी चांगला वागला. त्यांना एक मुलगाही झाला. याच काळात पती एका ठिकाणी वाहनचालक म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर तो पत्नीला त्रास देऊ लागला. मारहाण, शिवीगाळ करू लागला; पण केवळ संसार टिकविण्यासाठी हे सगळं ती सहन करीत होती. पैशांसाठी ती धुण्याभांड्याची कामे करू लागली. पतीकडून मुलगा आणि तिच्याकडे दुर्लक्ष होत असे. सात वर्षे हा प्रकार ती सहन करीत होती. 2008 मध्ये पतीने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. 

तिने पतीला विनवणी केली, इतरांमार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण नाइलाजाने भाड्याची खोली घेऊन मुलासोबत राहण्याची वेळ तिच्यावर आली. तिने संसार जुळविण्यासाठी पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याने तिला नांदविण्यास नकार दिला. 2014 मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. धुण्याभांड्याची कामे करीत मुलाला शिक्षण देत असतानाच न्यायालयीन लढाई करण्याची वेळ तिच्यावर आली. ऍड. हेमंत झंझाड यांच्यामार्फत तिने न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने तिची बाजू ग्राह्य मानत, पतीने तिला दरमहा अडीच हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिला.

Web Title: Court of Justice came to the victim's wife

टॅग्स