मुलीवर बलात्कार; पित्याला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

घरात एकट्या असलेल्या  स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 44 वर्षीय पित्याला विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

पुणे-  घरात एकट्या असलेल्या  स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 44 वर्षीय पित्याला विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघड झाला. तिच्या आईने याबाबत जाब विचारला असता त्याने दोघींनाही मारण्याची धमकी दिली. पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. सावत्र आई सकाळी सहा वाजता केअरटेकर म्हणून कामाला गेली, की संध्याकाळी पाच वाजता घरी यायची. तर, तिच्या वडिलांची कामाची वेळ रात्री आठ ते सकाळी नऊ अशी असायची. भावांची शाळा सकाळची, तर ती दुपारी शाळेत जात होती. मार्च 2016 मध्ये तिचे वडील सकाळी नऊ वाजता कामावरून घरी आले. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली व बलात्कार केला. वारंवार हा प्रकार घडला. 

28 मार्च 2016 रोजी सामाजिक कार्यकर्त्या, तसेच माई बाल भवनच्या प्रतिज्ञा देशपांडे या त्यांच्या घरी आल्या. आईला झालेल्या प्रकाराबाबत विचारल्यानंतर मुलीला त्या देहूरोड पोलिस ठाण्यात घेऊन गेल्या. तेथे मुलीने सर्व प्रकार सांगितल्यानंतर पित्याला अटक केली होती. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. देहूरोड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक ज्योती पाटील यांनी तपास केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court sentenced to father life-imprisonment for rape on self daughter