सबळ पुरावे दाखल न करणाऱ्या सीबीआयवर न्यायालयाचे ताशेरे 

सनिल गाडेकर
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे : रेल्वे तिकीट विक्रीमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या खटल्यात सबळ पुरावे दाखल न करणा-या केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) न्यायालयाने ताशेरे ओढले. गुन्हा सिद्ध करणारे पुरावे नसल्याने या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन लिपिक महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

सीबीआयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी सीबीआयला फटकारले. या प्रकरणात गुलेशाहेवर शब्बीर शेख आणि खुशबू बगाडे या वरिष्ठ तिकीट बुकिंग लिपींकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघी पुणे रेल्वे स्टेशन येथे कार्यरत होत्या. मुख्य तिकीट तपास निरीक्षकांच्या पथकाने आझाद हिंद हावडा एक्‍सप्रेसची 2016 साली दौंड येथे तपासणी केली. त्यात 1 हजार 860 रुपयांचे तिकीट प्रवाशाकडून जप्त करण्यात आले. हे तिकीट बनावट असल्याचा संशय आल्यानंतर तपासादरम्यान शेख व बगाडे यांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून आरोपींना दोषारोपपत्रासह सादर केले होते. मात्र त्यात कोणतेही सबळ पुरावे नव्हते. आरोपी काम करत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

तिकिटांची प्रिंट काढताना त्याच्याकडून काही घोटाळा करण्यात येतो का याचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांना सादर करता आले असते. तसेच आरोपी महिलांबरोबर काम करीत असलेल्या इतर बुकिंग लिपीकांचे जबाबही नोंदविण्यात आले नाहीत. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असे निरीक्षण न्यायाधीशांनी निकालात नोंदविले आहे.

Web Title: The court stricture CBI for not to filing strong evidence