मुलाला भेटण्याची पित्याला परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

पुणे : कौटुंबिक भांडणामुळे दुरावलेल्या मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. समुपदेशनात अटी पाळून संबंधित पिता त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला महिन्याच्या पहिल्या आणि तिस-या शनिवारी दोन तास भेटू शकतो, अशी तडजोड कौटुंबिक न्यायालयात हिंसाचारप्रकरणी दाखल केलेल्या दाव्यात झाली आहे. 

या बाबत सविस्तर माहिती अशी की, अर्चना आणि संतोष यांचे नोव्हेंबर 2013 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर संपत्तीवरून व कौटुंबिक कारणांवरून वाद झाले होते. दरम्यान, त्यांना मुलगा झाला. त्यानंतर वाद मिटतील, अशी आशा होती. मात्र, तरीही त्यांच्यात मेळ बसेना. त्यामुळे अर्चना हिने संतोष यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. तसेच ती संतोष याला मुलगा अभिजितला भेटू देत नव्हती. त्यामुळे मुलाचा काही कालावधीसाठी ताबा मिळावा म्हणून त्यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. 

आई सांगते त्याप्रमाणे अर्चना वागते, असा आरोप संतोष यांनी केला होता. तर संतोष हा अभिजितवर काळी जादू करतो. त्यामुळे त्याला त्याचा ताबा देऊ नये, असे अर्चनाने अर्जात नमूद आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तडजोडीनुसार संतोष हे महिन्याच्या पहिल्या आणि तिस-या शनिवारी दोन तास गुरुवार पेठेतील महाराणा प्रताप गार्डन येथे अभिजितला भेटू शकतात. तसेच जूनमध्ये त्याचा वाढदिवस पित्याबरोबर साजरा करण्याची परवानगी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court take decision fathers permission to meet child