आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

mla bharat bhalke
mla bharat bhalke

पुणे :  मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना  रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. आमदार  भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार करून बरे होऊन भालके घरी आले होते, मात्र नंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली.  पुन्हा त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

यापूर्वी कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना काही काळ रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. कोरोनावर मात करत ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळाले होते.  डिस्चार्ज मिळताच त्यांनी नागरी कामांचा धडाका सुरू केला होता.  पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघासह जिल्ह्यात जनावरांसाठी लंपीची लस उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com