'कोविड रुग्णवाहीका' (ॲब्युलंन्स) भोर नगरपालिकेला दिली मोफत; कोणी ते पहा

Covid-Ambulance
Covid-Ambulance

भोर (पुणे) - शहरातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने भोर नगरपालिका प्रशासनास 'कोविड रुग्णवाहीका' (ॲब्युलंन्स) मोफत देण्यात आली. ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी ही रुग्णवाहीका मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, नगरपालिकेचे गटनेते सचीन हर्णसकर, कार्यालयीन प्रमुख महेंद्र बांदल, आरोग्य अधिकारी लालासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक जगदीश किरवे आदींसह नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रुग्णवाहिका नसल्यामुळे कोरोनाग्रस्तांना कोविड सेंटरमध्ये आणि रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. याशिवाय कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या अंत्यविधीसाठीही विलंब होत होता. नागरपालिका प्रशासनास आतापर्यंत रुग्णवाहिकेसाठी शासकीय रुग्णालय किंवा खासगी हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागत होते.

साठी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांना शहरातील कोरोना रुग्णासाठी तात्पुरती रुग्णवाहीका देण्याची विनंती केली. त्यानुसार राजीव केळकर यांनी सर्व सोयीसुविधांयुक्त असलेली ' कोविड रुग्णवाहीका' आज नगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केली.

राजीव केळकर यांनी रुग्णवाहिकेची चावी मुख्याधिका-यांकडे दिली. ही रुग्णवाहीका फक्त कोरोना रुग्णांसाठीच वापरण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. ध्रुव प्रतिष्ठानमार्फत कोरोना रुग्णांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासही एक रुग्णवाहीका देण्यात आली असल्याचे राजीव केळकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com