आडात पडलेल्या गायीला जीवदान (व्हिडिओ)

पिंपळवंडी (ता. जुन्नर) - आडातून बाहेर काढलेली गाय व युवक.
पिंपळवंडी (ता. जुन्नर) - आडातून बाहेर काढलेली गाय व युवक.

पिंपळवंडी - येथे आडात पडलेल्या गाईला एक तासाच्या अथक परिश्रमानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात तरुणांना यश आले.

पिंपळवंडी येथील दिनकर माळी यांची गाय मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. याबाबत त्यांनी या गाईचा गावात शोध घेतला. मात्र, ती दिसून आली नाही. त्यानंतर सातच्या सुमारास गाय हंबरत असल्याचा आवाज माळी यांना आला. त्यांनी आवाजाचा माग घेतला असता त्यांना वस्तीजवळ असलेल्या जुन्या काळामधील असलेल्या आडामधून हा आवाज येत असल्याचे लक्षात आले.त्यांनी गाय आडात पडल्याचे वनखात्याला कळविले.

मात्र, वनखात्याच्या रेस्क्‍यू टीममधील कार्यकर्ते बाहेर असल्यामुळे ही टीम येऊ शकली नाही. त्यानंतर दिनकर माळी यांनी येथील ग्रामस्थांच्या मदतीने या गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, या आडाचा व्यास अरुंद असल्यामुळे या गाईला वर काढण्यात अडचण येत होती. अखेर वडगाव कांदळी येथील युवक प्रफुल्ल गुंजाळ याने अंधार असतानाही स्वतः दोरीच्या साहाय्याने साधारणतः पन्नास ते साठ फूट खोल असलेल्या व अरुंद व्यास असलेल्या आडात जीव धोक्‍यात घालून उतरला व त्याने त्या गायीच्या पोटाला रस्सीबांधून पुन्हा वरआला. त्यानंतर गणेश फुलसुंदर, मयूर माळी, बाळू पवार, दिनेश माळी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने या गायीला वर काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com