esakal | संक्रातीला पुजेसाठी लागणाऱ्या मातीची सुगडी बनविण्याच्या कामाला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

Craftsmen from Kumbharwada in Pargaon have made more than two lakh Sugadis for Sankrati Puja2.jpg

संपूर्ण कुंभारवाड्यातील एकूण सहा कुटुंबामधून सुमारे दोन लाखाहून अधिक सुगडी तयार झाली आहेत.

संक्रातीला पुजेसाठी लागणाऱ्या मातीची सुगडी बनविण्याच्या कामाला वेग

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : संक्रातीचा सण सव्वा महिन्यावर आला आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या संक्रातीसाठी लागणाऱ्या  मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातून मागणी वाढल्याने सुगडी बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

हे ही वाचा : कौतुकास्पद ! रस्त्यावर सापडलेला 20 हजाराचा मोबाईल प्रामाणिकपणे मूळ मालकास केला परत
 
संपूर्ण कुंभारवाड्यातील एकूण सहा कुटुंबामधून सुमारे दोन लाखाहून अधिक सुगडी तयार झाली आहेत. पुढील आठवडाभरात आणखीन लाखभर सुगडी तयार होतील पारंपारिक लाकडी चाकावर सुगडी बनवत असताना येथील कारगिरांनी विजेवर चालणाऱ्या मोटारीवरील चाकावर सुगडी बनविण्यास सुरवात केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. संक्रातीला पुजा करण्यासाठी वाण म्हणून महिला वापरत असलेल्या मातीची सुगडी (लहान आकाराची मडकी) बनविण्याच्या कामाला येथील कुंभारवाड्यात दिवाळीनंतर सुरवात होते. 

हे ही वाचा : इंदापूर क्रीडा संकुलाचा बदलला चेहरामोहरा ; अशी घेतली जिल्ह्यात भरारी 

येथील काही कुंभार व्यावसायिकांनी पारंपारिक सुगडी बनवत असताना त्याला व्यावसायिक स्वरुप देत संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुगड्यांना ठोक स्वरुपात ग्राहक शोधण्याचे काम केले. व्यापाऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. खेड, जुन्नर, शिरुर, मावळ याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे शहरातून सुगड्यांच्या मागणीची आगाऊ नोंदणी झाली आहे. संपूर्ण कुंभार वाड्यात आत्तापर्यंत दोन लाख सुगडी तयार झाली असून आणखीन आठवडाभरात एक लाख सुगडी तयार होतील असे शंकर चव्हाण यांनी सांगितले.  

loading image