दाढी- कटिंगचे टेन्शन कशाला? 'बॉस' आहे ना साथीला...

राजेंद्र सांडभोर
Wednesday, 5 August 2020

केश कर्तनालये आणि ब्यूटी पार्लर या सेवांसाठी खेड तालुक्यातील येथील एका धडपड्या तरुणाने सहकाऱ्यांच्या साह्याने 'बॉस' (BOS- Book my Saloon) या नावाचे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. ते सर्वांसाठी उपलब्ध मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राजगुरुनगर (पुणे) : केश कर्तनालये आणि ब्यूटी पार्लर या सेवांसाठी खेड तालुक्यातील येथील एका धडपड्या तरुणाने सहकाऱ्यांच्या साह्याने 'बॉस' (BOS- Book my Saloon) या नावाचे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. ते सर्वांसाठी उपलब्ध मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे आणि अन्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

Image may contain: 1 person, plant

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

कोरोनामुळे नियमित जीवनव्यवहारांवर कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडला आहे. केश कर्तनालय ही पुरूषांची आणि ब्यूटीपार्लर ही महिलांची नियमित सुविधा यामुळे प्रभावित झाली आहे. जवळचा संपर्क येत असल्याने सरकार सलून चालवायला लवकर परवानगी देत नव्हते. आताही सोशल डिस्टंसिंग पाळून व्यवसाय करावा, असे सरकारचे म्हणणे आहे. याबाबत दिलासा मिळावा म्हणून टाटा मोटर्समध्ये अधिकारी पदावर काम करणाऱ्या किशोर सांडभोर या तरुणाने सहकार्‍यांच्या मदतीने हे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. यामुळे अनावश्यक गर्दी टाळून, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे शक्य होईल.

No photo description available.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

या ॲपवर पुढील सुविधा उपलब्ध आहेत 
* देशभरातील सर्व सलून, लेडीज ब्यूटीपार्लर, युनिसेक्स सलून यांची माहिती 
* ग्राहक कुठेही असला तरी त्याच्या जवळपासच्या सलूनची माहिती व उपलब्धता समजणार 
* सलून सेवेकरता नियोजित वेळ ऑनलाईन ठरवता येणार. त्यामुळे प्रत्यक्ष त्याठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज नाही.
* नियोजित वेळेपूर्वी वापरकर्त्याला सतर्क केले जाणार.
* घरी जाऊन सेवा पुरवणाऱ्या सलूनचीही माहिती उपलब्ध होणार.
* हे ॲप्लिकेशन "माय सेतू" ॲप्लिकेशनशी जोडले जाऊन त्यावरील अद्यावत माहिती ग्राहकांना मिळणार.
* यासाठी कुठलेही अतिरिक्त चार्जेस नाहीत.
* सलून व्यावसायिकांनाही ग्राहकांच्या नियोजित वेळा ठरवून वेळेचे नियोजन करता येणार. 
* सलूनमधील उपलब्ध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील.
* व्यावसायिकांना नोंदणीची सोपी पद्धत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Creating an app for salon professionals by a youth from Khed taluka