बनावट ई-मेल तयार करून एक कोटी 61 लाख लंपास 

बनावट ई-मेल तयार करून एक कोटी 61 लाख लंपास 

पुणे : मशिन विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांचे बनावट ई-मेल तयार करून अनोळखी व्यक्तींनी एक कोटी 61 लाख 17 हजार रुपये लंपास केले. यासंदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील न्याती युनिटी या इमारतीमध्ये ग्लॅट सिस्टिम कंपनीचे कार्यालय आहे. 

संबंधित कंपनी मशिन विक्रीचे काम करते. फिर्यादी या कंपनीच्या सचिव आहेत. या कंपनीच्या मशिन बांगलादेशमधील साका इंटरनॅशनल कंपनी तयार करते. दोन्ही कंपन्यांचे खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार ई-मेलद्वारे होतात. 27 मार्च ते 16 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत अनोळखी व्यक्तींनी दोन्ही कंपन्यांचे बनावट ई-मेल अकाउंट उघडून या कंपन्यांची गोपनीय माहिती मिळवली.

त्यानंतर ग्लॅट कंपनीस चुकीचे बॅंक अकाउंट क्रमांक देऊन ऑनलाइन व्यवहार करून 1 कोटी 61 लाख 17 हजार रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण बालवडकर तपास करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com