चीनी वस्तूंवर अवलंबून राहू नका, स्वदेशी वापरा; 'क्रेडाई –नॅशनल'चा नारा

credai national president satish magar reaction against Chinese products
credai national president satish magar reaction against Chinese products

पुणे : विकसकांनी आपल्या प्रकल्पांसाठीच्या बांधकामात चीनी साहित्य व उत्पादनांवर अलवंबून न राहता स्वदेशी उत्पादनांवर भर द्यावा, असे आवाहन क्रेडाई या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च संघटनेने आपल्या सभासदांना केले आहे. क्रेडाईचे देशभरात २० हजारांहून अधिक सभासद आहेत. लद्दाखमधील गलवान खोऱ्यात चीनी लष्कराशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आणि आपण देशासोबत एकजुटीने उभे आहोत हे दर्शवीत, क्रेडाई – नॅशनलने हे आवाहन केले आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना, ‘क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष सतीश मगर म्हणाले,  “आमचे सदस्य असणाऱ्या विकसकांना आम्ही आवाहन केले आहे, की त्यांनी चीनी वस्तूंवर अवलंबून न राहता, ‘स्वदेशी’ किंवा ‘मेड इन इंडिया’ ही संकल्पना आपल्या जीवनशैलीत व व्यवसायात प्रभावीपणे अंगीकारावी. रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित सर्व २५० उद्योगांनी देखील, सध्या चीनमधून आयात होणारी उत्पादने स्थानिक लघु व मध्यम उद्योजकांमार्फेत स्थानिक पातळीवरच तयार करावीत आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला पाठिंबा द्यावा...’’

‘कोविड-१९’मुळे चीनमधून होणारा मालाच्या पुरवठा सध्या तसाही थांबलेला आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. या आपत्तीकडे आपण संधी म्हणून पाहूयात... लघु व मध्यम उद्योजकांकडून स्थानिक पातळीवर आवश्यक बांधकाम साहित्याचे उत्पादन झाल्यास, खरेदीचा वेळ कमी लागेल, त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बांधकामे लवकर पूर्ण होऊ शकतील आणि विकसक व संघटनेच्या या भूमिकेमुळे स्थानिक लघु व उद्योजकांना अधिकची संधी उपलब्ध होऊन रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. 

रिअल इस्टेट क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश कच्च्या मालाची निर्मिती लघु व मध्यम क्षेत्रांकडून केली जाते. या निर्मितीस प्रोत्साहन देऊन, सध्या आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या उत्पादनासाठी स्थानिक कंपन्यांना पाठिंबा दर्शविण्यास क्रेडाई सज्ज आहे. त्यायोगे ‘स्वदेशी’चे धोरणही अंमलात आणता येईल. असेही श्री. सतीश मगर यांनी सांगितले. देशभरात रिअल इस्टेट क्षेत्रात ५ कोटी २० लाख कामगार कार्यरत आहेत. स्वदेशीच्या धोरणामुळे रोजगाराच्या संधींमध्ये आणखी वाढ होईल आणि अर्थव्यवस्थेला आवश्यक ती चालना मिळेल. त्याचप्रमाणे, रिअल्टी क्षेत्राशी संबंधित २५० हून अधिक लघु व मध्यम उद्योगांनाही प्रोत्साहन मिळून त्यामधून ‘जीडीपी’मध्ये एकंदरीत योगदान वाढेल. अशी आशा देखील श्री. सतीश मगर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com