Rahul Gandhi Pune: 'पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचे श्रेय फक्त हवाई दलाचे'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय फक्त हवाई दलालाच मिळायला हवे. भारताने हवाई हल्ला केला आणि तो करणे आवश्यक होते, कारण भारताविषयी चुकीचा समज होता कामा नये. भारत हा शक्तिशाली देश आहे हे वेळोवेळी दाखवून देणे गरजेचे आहे, आणि ते आपल्या देशाच्या सैन्याने दाखवून दिले असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

पुणे : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे श्रेय फक्त हवाई दलालाच मिळायला हवे. भारताने हवाई हल्ला केला आणि तो करणे आवश्यक होते, कारण भारताविषयी चुकीचा समज होता कामा नये. भारत हा शक्तिशाली देश आहे हे वेळोवेळी दाखवून देणे गरजेचे आहे, आणि ते आपल्या देशाच्या सैन्याने दाखवून दिले असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आमचा विरोध फक्त सैन्याच्या नावावर होणाऱ्या राजकारणाला आहे. सैन्याच्या नावावर राजकारण होऊ नये.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला सध्या शेकडो उपस्थिती असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने राहुल गांधींना वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारत आहेत.

Web Title: Credit of Airstrike goes only to the Airforce says Rahul Gandhi at Pune