विजेच्या खांबांना वेलींचा विळखा

लालटोपीनगर - विजेच्या खांबाला वेलींचा विळखा पडल्याने धोका निर्माण झाला.
लालटोपीनगर - विजेच्या खांबाला वेलींचा विळखा पडल्याने धोका निर्माण झाला.

पिंपरी - ‘महावितरण’ने शहरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बहुतांश विद्युत संचाच्या संरक्षक जाळ्यांना झाडेझुडपे आणि वेलींनी वेढल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे विजेच्या लोखंडी खांबांमध्ये वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

शहरात महावितरण कंपनीकडून विजेचे जोड देताना ते नियोजनशून्य पद्धतीने केल्याचे दिसून येते. ‘महावितरण’ने शहरामध्ये बहुतांश ठिकाणी फीडर पिलर, २२ तसेच ३३ केव्हीचे विद्युत संच रस्त्याच्या कडेला उभे केलेले आहेत. मात्र, सर्व रोहित्रे व संचांना पत्र्याचे हे संरक्षक कवच बसविणे आवश्‍यक आहे; परंतु प्रत्यक्षात ते बसविलेले नाहीत. या संचामध्ये असणाऱ्या उच्चदाब वाहिनीमुळे धोक्‍याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील रोहित्रांची ‘सकाळ’ प्रतिनिधींनी पाहणी केल्यानंतर स्पष्ट होत आहे.

संत तुकारामनगर, मोरवाडी, लालटोपीनगर, बिजलीनगर, भोसरी यासारख्या दाट लोकवस्ती याबाबत अनेक नागरिकांनी तक्रार केलेल्या आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही रोहित्राला पत्र्याच्या साह्याने संरक्षक कवच बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे उघड्यावर असलेल्या रोहित्रांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांचे संचही रस्त्याच्या कडेलाच उभे केल्याचे दिसून येते. या संचाभोवती लोखंडी जाळी बसवून संरक्षण देण्याचा प्रयत्न महावितरण कंपनीने केला आहे. मात्र, या लोखंडी जाळीवर वेलवर्गीय वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. शिवाय इतर झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ओल्या वेलींमधून लोखंडी खांबांमध्ये किंवा जाळ्यामध्ये वीज उतरून धोका निर्माण होण्याची शक्‍यता असताना ही झाडे किंवा वेली वेळेवर काढल्या जात नाहीत.

महावितरणकडून मॉन्सूनपूर्व तयारी केली जाते. त्यानंतर पावसाळ्यानंतरही उपाययोजना केल्या जातात; परंतु आता सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून ‘ट्री कटिंग’ केलेली नाही. आता लवकरच या कामाला सुरवात होईल.
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com