क्रिकेट खेळणाऱ्या मुलींनी साधला गेलबरोबर संवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने आज पुण्यातील ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-20 प्रदर्शनी सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट गेलशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

संग्रहालयात गेलने या मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या. तसेच त्यांच्या मनातील क्रिकेटविषयक काही शंकांचे निरसनदेखील केले.

या वेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे व क्रिकेट शिकणारी मुले उपस्थित होती. गेलने यंदा तो ज्या बॅटने आयपीएलमध्ये खेळला, ती बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयाकरिता पाटे यांच्याकडे सुपूर्त केली. याआधी गेलने त्याचा सहभाग असलेल्या टी-20 विश्वकरंडक विजेत्या वेस्ट इंडीज संघाची जर्सीदेखील संग्रहालयाला दिली आहे.

रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्‍वकरंडकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला चषक जिंकून देईल, असा विश्‍वास गेलने एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: cricket girl discussion with Chris Gayle