तेरा प्लॅस्टिक कंपन्यांना दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - राज्यभरात प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईला सुरवात झाली आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमधील १३१ प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांपैकी विनापरवाना १३ कंपन्या मंडळाकडून बंद करण्यात आल्या असून, आणखी ४१ कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या १३ कंपन्यांनी या मंडळाची पूर्वपरवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक उत्पादन, वापर, विक्री, वितरण आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, चमचे, ताटल्या, पेट बाटल्या आणि थर्माकोल साहित्याचा समावेश आहे. प्लॅस्टिक उत्पादन कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यांसाठी पाच तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीनही जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची पाहणी करून कंपन्या बंद करण्याची कारवाई केली जात आहे.

पुणे विभागातील १३१ प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांची पाहणी केल्यानंतर १३ विनापरवाना प्लॅस्टिक उत्पादन कंपन्या सापडल्या. या कंपन्या तत्काळ बंद करण्याची कारवाई करण्यात आली; तसेच या कंपन्यांचा विद्युत व जलपुरवठा जोडणी तोडण्याचा आदेशदेखील संबंधित विभागांना देण्यात आला आहे. तसेच आणखी काही कंपन्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
- डॉ. एच. डी. गंधे, पुणे विभाग प्रादेशिक अधिकारी,  प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Crime on 13 Plastic Company