महिला मृत्यूप्रकरणी ३ डॉक्‍टरांवर गुन्हा

महिला मृत्यूप्रकरणी ३ डॉक्‍टरांवर गुन्हा

चाकण - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील दोन रुग्णालयांतील तीन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 

सपना सुधीर पवळे (वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सुधीर मच्छिंद्र पवळे यांच्या फिर्यादीनुसार डॉ. अरगडे, डॉ. घाटकर, डॉ. सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना पवळे या प्रसूतीसाठी चाकण येथील डॉ. अरगडे हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दाखल झाल्या होत्या. तेथील औषधोपचारांमुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील डॉ. घाटकर, डॉ. सुपेकर यांच्या चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्या प्रसूत झाल्या; पण अर्भकाचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर सपना अत्यवस्थ झाल्याने क्रिटीकेअरमधील डॉक्‍टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

सकाळी डॉ. अरगडे हॉस्पिटलसमोर मृत महिलेच्या नातेवाइकांनी; तसेच माहेर असलेल्या आंबेठाण येथील संतप्त जमाव जमला होता. 

पोलिस ठाण्यात आई-वडिलांचा टाहो 
सपना यांच्या मृत्यूस डॉक्‍टर कारणीभूत आहेत, असा आरोप करत त्यांचे आई-वडील, नातेवाईक यांनी पोलिस ठाण्यात टाहो फोडला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी त्यांना धीर देत योग्य तो तपास केला जाईल. अंत्यसंस्कार करा, संबंधितांवर गुन्हा दाखल करतो, असे सांगितल्यानंतर नातेवाईक पोलिस ठाण्यातून गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com