नगरसेवकासह भावाविरूद्ध गुन्हा 

नगरसेवकासह भावाविरूद्ध गुन्हा 

पुणे - बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकासह त्याच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी सिद्धार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे (दोघेही रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डांगी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांचे चुलते हेमंत मिश्रीलाल डांगी व पिंकी हेमंत डांगी यांच्याकडून आंबेगाव बुद्रुक येथील मिळकत विकत घेतली होती. या व्यवहारासाठी सिद्धार्थ यांनी हेमंत डांगी यांना एक कोटी 39 लाख 15 हजार दिले होते. दरम्यान, बेलदरे बंधूंनी संबंधित मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादी हे बेलदरे यांना त्यांची मिळकत विक्री करत असल्याचा बनावट करारनामा तयार केला. याबाबत फिर्यादी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रार अर्जासोबतच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्या वेळी बेलदरे बंधूंनी बनावट कागदपत्रे तयार करून मिळकत लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

नगरसेवक युवराज बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार यांनी बनावट कागदपत्रे तयार करून मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
- विष्णू ताम्हाणे,  पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com