वडकीमध्ये खंडणीसाठी दुकानाच्या तोडफोडीबद्दल पाच जणांविरोधात गुन्हा

crime_logo
crime_logo

वडकी (हवेली) - येथील एका किराणा दुकान मालकाकडुन दर महिन्याला पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी गणेश दिलीप मोडक (रा. वडकी) याच्यासह पाच अनोळखी तरुणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. किराना दुकान मालक भागीरथ रमेशकुमार जांगीड (वय- २९ रा. दत्तनगर, वडकी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीरथ जांगीड यांचे वडकी गावाच्या हद्दीत ममता ट्रेडिंग कंपनी नावाने किराणा मालाचे दुकान आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन गणेश मोडक हा जांगीड यांच्याकडे महिन्याला पाच हजार रुपये खंडनीची मागणी करत होता. मात्र खंडनी जेण्यास जागीड यांनी नकार दिल्याने, दुकानाची तोडफोड करण्याची धमकी गणेश मोडक याने दिली होती.   

सोमवारी (ता. ९) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल वरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच अनोळखी तरुनांनी जाग़ड यांच्या दुकानावर दुकानावर दगडफेक करून दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोड चालु असतांना वरील पाच तरुनांनी, मोडक याला हफ्ता नाही मिळाला तर अशाच पद्धतीने पुढेही तोडफोड करण्यात येईल असे म्हणत तेथून पळ काढला. दरम्यान भागीरथ जागीड यांनी घडलेली गोष्ट त्यांच्या मित्रांना कळवली असता, गणेश मोडक याने चुनाराम मानारामजी चौधरी, पोखाराम पुनराम चौधरी, अईधानराम पुराराम चौधरी, महेंद्रसिंग मोहनलाल राठोड, कैलास गंगाराम चौधरी, (सर्व रा. उरुळी देवाची,ता. हवेली) यांनाही यापूर्वी खंडणी मागुन, त्यांच्या दुकानांची तोडफोड व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गणेश दिलीप मोडक याच्यासह सहा जणांवर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com