बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा

बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांवर गुन्हा

पुणे - नामवंत कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट कीटकनाशके तयार करून विक्री करणाऱ्या चार कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहबीरसिंग हरबन्ससिंग जज्ज (वय ५६, रा. गुजरात) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते गुजरातस्थित युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल)  कंपनीत सुरक्षा अधिकारी आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करून कंपनीकडून ‘क्विक फॉस’ या यूपीएल ब्रॅंडचा वापर करून कीटकनाशकांची विक्री केली जाते. केंद्र सरकारने २००१ पासून ॲल्युमिनिअम फॉस्फेट ५६ टक्के, ३ ग्रॅम वजनाची पॅकिंग ट्यूबमध्ये १० टॅब्लेट किंवा २० टॅब्लेटचे पॅकिंग व विक्री करण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही पुणे व सातारा जिल्ह्यातील काही कंपन्या संगनमताने संबंधित कंपनीच्या क्विक फॉस व यूपीएल या ब्रॅंडच्या नावाचा वापर करत बनावट ॲल्युमिनिअम फॉस्फेटचे पॅकिंग व विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीने कर्वे रस्ता येथील रॉयल ॲग्रो ऑरगॅनिक, खंडाळ्यातील पारगाव येथील रॉयल मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनी, शिरवळ येथील रॉयल ॲग्रोसाइड व खंडाळ्यातील शिंदेवाडी येथील रॉयल ईडीबी मॅन्युफॅक्‍चरिंग या कंपन्या, त्यांचे मालक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याचा भंग व फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com