विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

पुणे - विवाहितेला मंगळ आणि गुरू असल्याचे कारण देऊन जादूटोण्याच्या नावाखाली तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार व जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे - विवाहितेला मंगळ आणि गुरू असल्याचे कारण देऊन जादूटोण्याच्या नावाखाली तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार व जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पूजा अमित क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पती अमित मोहनराव क्षीरसागर, सासरा मोहनराव क्षीरसागर व सासू सुनीता क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पूजाचे अमित क्षीरसागर याच्यासमवेत १४ एप्रिल २०१८ ला लग्न झाले होते. तेव्हापासूनच पतीसह सासू-सासऱ्यांकडून तिला मंगळ आणि गुरू असल्याचे सांगून छळ केला जात होता. सासू सुनीता क्षीरसागर ही अघोरी विद्या करीत असल्याने तिने पूजाच्या मनात भीती निर्माण करून मंगळ, गुरूची छाया घालवून तिची शांती करण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले होते. यासाठी ती पूजाला शारीरिक व मानसिक त्रास देत होती. त्यानुसार पूजाने सुरवातीला माहेरहून एक लाख रुपये आणून दिले. त्यानंतर दोन लाख रुपयांसाठी पुन्हा शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येऊ लागली. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आर. ए. पवार करीत आहेत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against three accused in harassment case