पुण्यात गुन्हे शाखेकडून 'पब'वर छापे ; चार लाखांची दारु जप्त

raid.jpg
raid.jpg

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी पहाटे छापे घातले. त्यामध्ये बेकायदा दारु विक्री करत नियमभंग करणाऱ्या पबच्या मालक, व्यवस्थापक व डिजेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांनी लाखो रुपये किंमतीची दारु यावेळी जप्त केली.

शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व मोठ्या आवाजात गाणी लावून शांततेचा भंग करणाऱ्या आठ पब व हॉटेल्सवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी पहाटे कारवाई केली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार हडपसर व मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले .

मुंढवा व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पब व हॉटेल्स कायद्याचे उल्लंघन करून जास्त वेळ उघडे ठेवले जात असल्याबद्दल, हॉटेल व पबमध्ये म्युझिक सिस्टिमवर मोठ-मोठ्या आवाजात गाणी वाजवून रात्रीच्यावेळी सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. 

 द हाउस ऑफ मेडीची, हॉटेल वेस्टीन, हॉटेल पेन्टहाउस, हॉटेल क्‍लब अलेरो, हॉटेल मेट्रो, हॉटेल अन वाइंड, हॉटेल हेफ एनएन लाउंज, हॉटेल क्‍युबा लिबरे अशी कारवाई केलेल्या हॉटेल व पबची नावे आहेत. तर रविवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकांनी पुन्हा चतुश्रृंगी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पबवर कारवाई केली. तेथेहीे बेकायदा दारु विक्री होत असताना चार लाख रुपयांच्या 196 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com