कामगार मृत्यूप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - इमारतीच्या टेरेसवरील पॅराफिटचे कमकुवत बांधकामाचे ब्लॉक अकराव्या मजल्यावरून कोसळून झोपडीवर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या कामगारासह त्याचा चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना येवलेवाडी येथे घडली होती.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंता, बांधकाम ठेकेदार व सुरक्षा पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अनबर ताजुद्दीन आलम (वय 22, रा. द्वारिका लेबर कॅम्प, येवलेवाडी) असे मृत बांधकाम कामगाराचे नाव आहे. तर दुर्गेश पुसव निसाद व त्यांचा मुलगा परमेश्‍वर हे गंभीर जखमी झाले आहेत. येवलेवाडीत साई द्वारिका या अकरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तरीही तेथे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक साधनसामग्री किंवा उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच इमारतीच्या जवळच कामगारांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान, मागील गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता इमारतीच्या टेरेसवरील पॅराफिटचे कमकुवत बांधकाम केलेले आहे. त्याचवेळी झालेल्या पावसामुळे बांधकामाचे ब्लॉक कामगारांच्या झोपड्यांवर पडले. त्यामध्ये अनबर यांचा मृत्यू झाला.

Web Title: crime on builder by worker death