फसवणूकप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Crime
Crime

पिंपरी - छत्तीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी ऐश्‍वर्या प्रमोद निजामपुरकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी (वय 55), कविता दिलीपकुमार कुलकर्णी (दोघेही रा. ससाणेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीचा विश्‍वास संपादन करुन फिर्यादीच्या कंपनीकडून सीएनसी, व्हिएमसीचे पार्ट तयार करुन घेतले. तो माल स्वत:च्या कंपनीतर्फे प्रितेश मोरे हे कामास असलेल्या हेल्कोन सिस्टम एलएलसी या कंपनीला विकून पैसे घेतले. दरम्यान, यामध्ये फिर्यादीची 36 लाख 48 हजार 810 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com