डीएसकेंविरुद्ध आणखी एक दावा

DSK
DSK

पुणे - दहा लाखांचा चेक न वटल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. नाशिककर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

माधवराव गोविंदराव गुजराथी ( वय 81, रा. पर्वती) यांनी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध दहा लाख रुपयांचा चेक न वटल्याप्रकरणी दावा दाखल केला आहे. गुजराथी यांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत दहा लाख रुपये गुंतविले होते. त्यांचा दहा लाख रुपयांचा चेक 1 जून 2017 रोजी न वटता परत आला होता. याप्रकरणी दावा दाखल केल्यानंतर डी. एस. कुलकर्णी आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीसही बजावली होती. सध्या येरवडा जेलमध्ये असलेल्या डी. एस. कुलकर्णी आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला आदेश द्यावा, अशीही मागणी मागील सुनावणीत करण्यात आली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com