अतिक्रमणांवर कारवाई

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - रस्त्यांवरील बेकायदा हातगाड्या, फेरीवाले, पथारी व्यावसायिक आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कामगारांचे हितसंबंध मोडून काढण्यासाठी या विभागानेच धडक कारवाई सुरू केली आहे.

कारवाईच्या केवळ २० मिनिटे आधी ठिकाणाची कल्पना देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी पथकांना दिली जात असून, अन्य भागातही कारवाईसाठी पाठविले जात असल्याने बेकायदा व्यावसायिकांकडून ‘हप्तेखोरी’ करणारे अधिकारी-कामगार धास्तावले आहेत. 

शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमण विभागासह महापालिकेने नेमलेले कंत्राटी अधिकारी-कामगार आहेत. क्षेत्रीय कार्यालयानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके तयार करून नियमित कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. पथकांची नेमणूक होताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही कामगार बेकायदा व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसाय आणि त्याच्या ठिकाणानुसार संबंधितांकडून रोजच्या रोज ठराविक पैसे घेऊन कारवाईतून त्यांची सुटका केली जाते. त्यामुळे कारवाईसाठी येणाऱ्या पथकांना न जुमानता बेकायदा व्यावसायिकांनी आपली दुकाने वाढविली आहेत. 

बेकायदा व्यावसायिकांना कारवाईची माहिती आधीच देऊन त्यांच्याकडून कामगार पैसे घेत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सर्वच क्षेत्रीय कार्यालयांकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहिमेचा उद्देश साध्य होण्याची आशा महापालिका प्रशासनाला होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता या पथकांना आता धडक कारवाईचा आदेश देताना परिसरही तेव्हाच ठरविण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्या भागात जाऊन सरसकट कारवाई करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com