बारामतीत शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मिलिंद संगई
Saturday, 26 September 2020

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणा-या आंदोलकांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती संवर्गात समावेश करावा या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 25) गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी हे आंदोलन झाले होते.

बारामती (पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणा-या आंदोलकांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती संवर्गात समावेश करावा या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 25) गोविंदबाग या पवार यांच्या निवासस्थानी हे आंदोलन झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी पांडूरंग मारुती कचरे (रा. काटेवाडी, ता. बारामती), गोविंद देवकाते (रा. निरावागज, ता. बारामती), गणेश कोकरे (रा. पणदरे, ता. बारामती), अजित मासाळ (रा. काटेवाडी), भारत देवकाते (रा. मेखळी, ता. बारामती) व अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिस कर्मचारी नितीन चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली. 

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदी लागू केली असताना त्याचे उल्लंघन करून आंदोलन करण्यात आले. कोविड विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असताना सोशल डिस्टन्सिंग न राखता आंदोलन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime filed against protesters in front of Sharad Pawar's house in Baramati