१०७ गोदामे हटविली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

चिखली - जाधववाडी -कुदळवाडी परिसरातील सुमारे दहा एकर जागेत थाटलेल्या १०७ अनधिकृत गोदामांवर शुक्रवारी (ता. २८) कारवाई करण्यात आली. प्रथमच एवढ्या प्रमाणात अशी कारवाई झाली. महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे यात सहभाग घेतला. यात सुमारे दहा एकरचा परिसर रिकामा करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाधववाडी कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे थाटण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी महापालिका तसेच प्रदूषण महामंडळाकडे आल्या होत्या. त्यानुसार काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषण महामंडळ, महापालिका आणि पोलिस अधिकारी यांच्या बैठकीत या गोदामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शुक्रवारी रिव्हर रेसिडेन्सीच्या मागील बाजूला इंद्रायणी नदीपात्रालगत कारवाई करण्यात आली.

पाच जेसीबी मशिनच्या साह्याने सकाळी अकराच्या सुमारास या कारवाईस सुरवात झाली. पालिका अधिकारी, अग्निशमन विभाग व प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबरच पालिकेचे २०, तर पिंपरी-चिंचवडचे ८० अशा एकूण शंभर पोलिसांचा फौजफाटा या वेळी तैनात करण्यात आला होता. कारवाई सुरवात होताच काही गोदाममालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर एक-एक करत सुमारे नव्वद गोदामे जमीनदोस्त करण्यात आली, तर सतरा गोदाममालकांनी स्वतः गोदामे हटविली. बहुतेक गोदामे प्लॅस्टिक, कचरा, लाकूड आणि भंगारमालाने भरलेली होती.

Web Title: Crime on Godown in Jadhavwadi and Kudalwadi