Crime News : दुकानांमधील स्फोटाचा समांतर तपास एटीएसकडून

कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
crime investigation of satara shop blasts ATS possibility of compressor explosion
crime investigation of satara shop blasts ATS possibility of compressor explosion esakal

पुणे : सातारा रस्त्यावरील दुकानांमधील स्फोटाचा समांतर तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केला आहे. सहकारनगर पोलिसांनी या घटनेत जखमी झालेल्या दुकानमालकाकडे चौकशी केली. दुकानातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात डी मार्ट दुकानाजवळ इंद्रनी सोसायटीत तीन दुकाने आहेत. या दुकानात गॅस गिझर, फ्रिज, वॉशिंग मशिन, कॉम्प्रेसरसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानात सोमवारी मध्यरात्री अचानक स्फोट होऊन दुकानमालक सुधीर कोलते (वय ४८) आणि हॉटेल व्यावसायिक सागर सणस हे दोघे जखमी झाले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असून, सहकारनगर पोलिसांनी कोलते यांच्याकडे स्फोटाबाबत चौकशी केली. दुकानात रात्री उशिरा बॉक्स पॅकिंग करीत असताना अचानक हा स्फोट झाल्याचे कोलते यांनी सांगितले. परंतु स्फोटाचे नेमके कारण तपासण्यात येत आहे, अशी माहिती सहकारनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे इमारतीमधील सदनिका आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या स्फोटाबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. एटीएस अधिकाऱ्यांनी संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसने घटनास्थळावरून काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

स्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दुकानांमध्ये झालेल्या स्फोटाची घटना दुकानांबाहेर आवारातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुकानांमध्ये मोठ्या तीव्रतेचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com