आयटी कंपनीतील महिलेच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आयटी कंपनीतील महिलेबाबत अश्‍लील संभाषण करून, ते मेसेज व्हायरल केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने कंपनीतील विशाखा समितीकडे तक्रार केली; पण न्याय न मिळाल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - आयटी कंपनीतील महिलेबाबत अश्‍लील संभाषण करून, ते मेसेज व्हायरल केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने कंपनीतील विशाखा समितीकडे तक्रार केली; पण न्याय न मिळाल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. पार्टन गेव्हीन, हिरण्या कॉशीका, कंपनीची एचआर मॅनेजर महिला, डेव्हिड हॉफमेन यासह इतरांवर विनयभंग व आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पाच वर्षांपासून या कंपनीत प्रिन्सिपल कन्स्टलन्स या पदावर कार्यरत आहेत. संशयित आरोपी गेव्हीन हा यूकेमधून कंपनीचा कारभार पाहतो, तर हिरण्या ही बंगळूरमधील आहे. या दोघांनी फिर्यादीचे एक जणासोबत अनैतिक संबंध आहेत, असे एका कंपनीतील महिलेला सांगितले. तसेच मेसेजही टाकले. हा प्रकार फिर्यादीला समजल्यानंतर त्यांनी एचआर मॅनेजरकडे तक्रार केली. विशाखा समितीकडेही तक्रार केली; पण याची दखल घेतली नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime IT Company Women Breach of modesty