सहकारनगमध्ये दहशत पसरविणाऱ्या कोयता टोळीवर "मोका'नुसार कारवाई

बिरामणे टोळीविरुद्ध कारवाईचा बडगा
crime nerws  Action as per Mokka gang spreading terror in Sahakarnagar pune
crime nerws Action as per Mokka gang spreading terror in Sahakarnagar puneesakal

पुणे : सहकारनगर, धनकवडी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कोयता टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. संबंधित टोळीतील नऊ जणांविरुद्ध हि कारवाई करण्यात आली आहे. आदेश पांडुरंग बिरामणे (वय 23), संदीप सोमनाथ शेंडकर (वय 23), सलमान उर्फ सल्या हमीद शेख (वय 23), आफान बशिर शेख (वय 20), सौरभ शिवाजी भगत (वय 21 ), ऋषिकेश उर्फ सनि अनिल शिंदे (वय 21), सुफियान बशिर शेख (वय 19), राजकुमार शामलाल परदेशी (वय 23, सर्व रा. बालाजीनगर धनकवडी) अशी "मोका'नुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश बिरामणे व त्याच्या साथीदारांनी सहकारनगर, धनकवडी परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबर दुखापत, अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे सहकारनगर पोलिस ठाण्यात यापुर्वी दाखल होते. संबंधीत आरोपींवर पोलिसांनी तडीपार कारवाईही केली होती, मात्र त्यानंतरही त्यांच्याडून संबंधित आदेशाचे उल्लंघन करुन गंभीर गुन्हे करण्यात आले होते, लोकसेवकास धमकाविणे आणि लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावर यांनी संबंधित टोळीविरूद्ध "मोका'नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविला होता. त्यास त्यांनी मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत 78 "मोका'ची कारवाई झाली आहे, तर मागील 2022 मध्ये 15 कारवाया करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com