नात्यातील महिलेला वाईट हेतूने खुणावलं; अपहरण करून तरुणाचा खून

crime news murder
crime news murder

पिरंगुट - नात्यातील महिलेला वाईट हेतूने खुणावल्याच्या संशयातून पिरंगुट (ता. मुळशी) येथील तरुणाने तीन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह घोल (ता. वेल्हे) येथे नेऊन जाळण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल काशिनाथ इंगवले (वय 32), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश विजय केदारी (वय 21, रा. पिरंगुट), विक्रम पंढरीनाथ जगताप (वय 21, रा. पिरंगुट), प्रमोद भीमराव कांबळे (वय 30, रा. कासार आंबोली) व शेखर बाळासाहेब केदारी (वय 23, रा. पिरंगुट), या संशयित आरोपींना पौड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत गीता दीपक इंगवले यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश केदारी, शेखर केदारी, विक्रम जगताप व प्रमोद कांबळे यांनी राहुल याचे बुधवारी (ता. 24) सायंकाळी कासार आंबोली येथून मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर त्याला कासार आंबोली येथील खडी मशिन परिसरात नेण्यात आले. त्याठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह घोल येथे नेऊन जाळण्यात आला. पौड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून वरील चार आरोपींना अटक केली.

पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनायक देवकर, रवींद्र नागटिळक, जय पवार, अनिकेत सोनवणे, तुषार भोईटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com