दौंड शहरात ७०० किलो गोमांस जप्त, ७ गायींची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 700 kg beef seized in Daund city 7 cows rescued pune

दौंड शहरात ७०० किलो गोमांस जप्त, ७ गायींची सुटका

दौंड : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून कत्तलीसाठी आणलेल्या ७ गायींची गोरक्षक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सुटका झाली आहे. कारवाईत एका वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना दौंड शहरातील इदगाह मैदानावळ एका हॅालच्या भिंतीला लागून यांना ०७ गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी माहिती पोलिसांना कळविल्यानंतर बारामती उप विभागाचे पोलिस उप अधीक्षक गणेश इंगळे यांच्या निर्देशानुसार दौंड पोलिस ठाण्याच्या फौजदार सुनिता चवरे घटनास्थळी पोलिस पथकासह दाखल झाल्या. त्यांनी केलेल्या कारवाईत गोमांस आणि गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या दोन कार जप्त करण्यात आल्या.

कारवाई दरम्यान वाहनचालक किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, माळशिरस, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य तीन साथीदार पळून गेले. पोलिस नाईक अमिर शेख यांच्या फिर्यादीनुसार या प्रकरणी इद्रिस आबिद कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड), किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, माळशिरस, जि. सोलापूर), बबलू कुरेशी व मुश्रीफ कुरेशी (दोघे रा. बारामती) या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इद्रिस कुरेशी याच्यावर गोहत्या व गोमांस वाहतूक प्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पांडुरंग थोरात, अंमलदार महिंद्र लोहार, विकास गावडे, अमिर शेख, निखिल जाधव, योगेश गोलांडे व रवी काळे यांनी या कारवाईत भाग घेतला. दौंड पोलिसांनी सदर सात गायींची तालुक्यातील एका गोशाळेत रवानगी केली आहे.

Web Title: Crime News 700 Kg Beef Seized In Daund City 7 Cows Rescued Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..