हातचालाखी करत दुकानाच्या गल्ल्यातून १ लाख १६ हजार लुटले

पाचशे रूपयांची नोट दाखवून त्याचे सुट्टे मागून हा प्रकार करण्यात आला.
crime
crimeesakal
Summary

पाचशे रूपयांची नोट दाखवून त्याचे सुट्टे मागून हा प्रकार करण्यात आला.

दौंड : दौंड शहराच्या(daund city) मुख्य चौकातील एका कापड दुकानात हातचलाखी करून दोन तरूणांनी गल्ल्यातील तब्बल १ लाख १६ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. चलनातून बाद झालेली पाचशे रूपयांची नोट दाखवून त्याचे सुट्टे मागून हा प्रकार करण्यात आला. (crime news Textile merchants in daund 500rs old note pune )

crime
आज विजयस्तंभ अभिवादन दिन

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. ३० डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विनोद ओसवाल यांचे विलास क्लॅाथ स्टोअर्स या दुकानात हा प्रकार घडला. इंग्रजी बोलणारे दोन तरूण दुकानात खरेदीसाठी आले व त्यापैकी एकाने पायमोजे तर दुसर्याने अंतर्वस्त्र दाखविण्यास सांगितले. पहिल्या तरूणाने पायमोजे विकत घेतल्यानंतर त्याचे पैसे देताना दुकानाचे व्यवस्थापक पांडुरंग गुंड यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर श्री. गुंड हे थोड्या गुंगीत गेले व त्यांनी नकळत गल्ल्याचा ताबाच त्या तरूणाला दिला. सोबत असलेल्या दुसर्या तरूणाने अंतर्वस्त्र दाखविण्याचे सांगत दुकानातील मदतनीसाला गुंतवून ठेवले होते. एकूण १ लाख १६ हजार ७३० रूपये काढून घेतल्यानंतर दोघे निघून गेले. व्यवस्थापक व मदतनीसाला हा प्रकार उशीराने लक्षात आला.

दरम्यान या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी पांडुरंग गुंड यांच्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात तरूणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रीकरणाच्या आधारे शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com