मुलाने मित्राच्या मदतीने केला बापाचा खुन

वरवंड येथील राजेंद्र दत्तात्रय म्हस्के (वय ४२) या बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
murder
murderSakal

वरवंड : येथील राजेंद्र दत्तात्रय म्हस्के (वय ४२) या बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.सदर मयत व्यक्तीच्या मुलानेच मित्राच्या मदतीने हा खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपी व स्वस्तीक संजय खडके (वय २१) दोघेही राहणार वरवंड ता.दौंड जिल्हा पुणे यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी माहीती दिली.वरवंड येथील राजेंद्र म्हस्के हे काही दिवसापासुन बेपत्ता होते.घरातुन चौफुला येथे सांगुन गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. या संदर्भात पाटस पोलिस चौकीत हरविल्याची नोंद करण्यात आली होती. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी मोठया शिताफिने या तपासाची चक्र फिरवली. तपासादरम्यान त्यांना बेपत्ता राजेंद्र यांची पत्नी व मुलगा यांच्या मध्ये विसंगत माहीती मिळत होती. त्यामुळे पोलिसांची मुलगा वृषभ याच्यावर संशयाइसुइ निर्माण झाली. पोलिसी शैलीत चौकशी करताचा या प्रकरणाचा भांड फोड झाला.

अल्पवयीन मुलगा व मित्र स्वस्तीक खडके यांच्या मदतीने वडीलांचा खुन केल्याची कबुली दिली.वडील राजेंद्र हे दारू पियुन आइला व मला सतत मारहाण करीत होते. २६ मे राजी राजेंद्र यांनी मला व आइला बेदम मारहाण केली.सकाळी वडील झोपेत होते.त्यावेळी मी माझा मित्र स्वस्तीक याला बोलावुन घेतले. त्यानंतर खडके याच्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली. त्यानंतर खडके यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात एका वनक्षेत्रामध्ये राजेंद्र म्हस्के यांना मृतदेह टाकला. दरम्यान,पोलिसांनी दोन्ही आरोपी व मयताची पत्नी यांना उस्मानाबाद येथे नेले असता. त्याठिकाणी राजेंद्र म्हस्के यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला. कपडयाच्या तुकडयावरुन तो ओळखण्यात आला. दरम्यान,बापाच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव बाबळे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com