अमानुषपणाचा कळस! शिव्या दिल्या म्हणून तरुणाला विवस्त्र करून दगडाने मारहाण

crime news pune man beaten case 2 arrested
crime news pune man beaten case 2 arrested

पुणे - शिव्या दिल्याच्या रागातून तरुणाची कपडे काढून त्यास दगडाने मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता कोंढवा खुर्द येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. 

याप्रकरणी शहनवाज शेख (वय 22) व सय्यदअली कुरेशी उर्फ गुटऱ्या (दोघेही रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दोघांसह त्यांचा साथीदार अरबाज शेख अशा तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहसीन गालीफ सय्यद (वय.28,रा.भाग्योदयनगर कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन याने तीन महिन्यापुर्वी आरोपी अरबाज शेख याच्या चुलत्याला उसने पैसे मागण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी अरबाजच्या चुलत्याने फोन न उचलता त्याच्या चुलतीने फोन उचलला होता. तेव्हा मोहसीन व चुलतीची फोनवरच त्यांच्यात वाद झाला. 

फोनवर झालेल्या वादाचा अरबाज याला राग आला होता.  शनिवारी सायंकाळी सात वाजता कोंढवा खुर्द येथे अरबाज व त्याच्या साथीदारानी मदतीने संगनमत करून मोहसीनचे कपडे काढून दगडाने मारहाण केली. यावेळी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मोहसीनच्या कानाला दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com