Pune Crime : बरोबर येण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news pune attack on transgender with knife over Refuse to come along pune
Pune Crime : बरोबर येण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime : बरोबर येण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : बरोबर येण्यास नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर कोयत्याने वार करणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसरमधील कात्रज मंतरवाडी रोडवरील इंदू स्टील कंपनीजवळ १२ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला. याप्रकरणी हडपसरमधील वैदुवाडी येथे राहणार्‍या २२ वर्षाच्या तृतीयपंथीयाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या तृतीयपंथी असून, त्या रात्री घरी जात होत्या. त्यावेळी चौघांनी त्यांना अडवून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह करु लागले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी हाताने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कोयत्याने मानेवर वार केला. फिर्यादी यांनी हात आडवा घातला असता हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.

Web Title: Crime News Pune Attack On Transgender With Knife Over Refuse To Come Along Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..