विश्रांतवाडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा चाकूने भोसकून खून

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून विश्रांतवाडी येथे तरुणाचा दगड ब्लॉक फेकून चाकूने भोसकून खून करण्यात आला
crime news  pune murder of youth stabbing anger vishrantwadi
crime news pune murder of youth stabbing anger vishrantwadisakal

विश्रांतवाडी - पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून विश्रांतवाडी येथे तरुणाचा दगड ब्लॉक फेकून चाकूने भोसकून खून करण्यात आला. तुषार जयवंत भोसले (वय २२ वर्षे, रा. दत्तावाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनाच्या गुन्ह्यात चार संशयित आरोपी सहभागी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून काही संशयितांना त्यांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. मूळचा दत्तवाडी येथे राहणारा तुषार विश्रांतवाडी येथे सर्वे न.११२ येथे मामाकडे येत होता. त्याचे येठी काही तरुणांशी पूर्वी भांडण झाले होते.

याच रागातून तुषार जाब विचारण्यासाठी आला होता. तेव्हा तरुणाच्या वडिलांनी व इतरांनी दगड, ब्लॉकने मारून व चाकूने भोसकून खून केला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हे बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आले असून विश्रांतवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. वस्तीमध्ये भीतीचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलिसांनी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com