बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता.13) भिगवण रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली.
crime news scythe attack on minor boy love affair in Baramati
crime news scythe attack on minor boy love affair in BaramatiSakal

बारामती : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता.13) भिगवण रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली. हल्ला झालेला अल्पवयीन मुलगा शहरातील त्रिमूर्तीनगर भागात राहतो. शुक्रवारी तो एका सलून दुकानात केस कापण्यासाठी गेला होता. तो दुकानाबाहेर थांबला असताना त्याचे मित्र असणाऱ्या तिघांनी हा हल्ला केला. संशयित तिघांपैकी एकाच्या प्रेम प्रकरणामध्ये हा अल्पवयीन मुलगा आडवा येत असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला. संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. 

यात त्याच्या डोक्याला व पाठीला जबर जखम झालेली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. भर रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे या भागात काही काळ खळबळ माजली होती. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दवाखान्यात जाऊन जखमीची चौकशी केली. घटनास्थळीही भेट दिली. संशयित आरोपीसुध्दा अल्पवयीन असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com