नक्षल्यांनी केली फळी मुन्शीची हत्या; खबरी असल्याचा संशय

या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले
crime News suspicion of being police informer Naxals killed Lucky Kumar Oxa Gadchiroli
crime News suspicion of being police informer Naxals killed Lucky Kumar Oxa Gadchirolisakal

गडचिरोली : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बुधवारी (ता. २२) रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडुर येथील तेंदूपत्ता फळी मुन्शीची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली. लच्छुराम ऊर्फ लकीकुमार ओक्सा (वय ३८) असे मृत मुन्शीचे नाव असून, तो बिनागुंडाजवळच्या गुसेवाडा येथील मूळ रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, लकीकुमार ओक्सा हा मलमपोडुर येथे तेंदूपत्ता फळीवर मुन्शी म्हणून काम पाहत होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी मलमपोडुर येथे गेले. त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले.

त्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने त्याची हत्या केली व गावाबाहेर मृतदेह फेकून दिला. गुरुवारी (ता. २३) सकाळी काही नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.विशेष म्हणजे, लच्छुराम हा जिल्ह्यात छोटी-मोठी ठेकेदारी करायचा. त्याचे संपूर्ण जिल्हाभर विविध राजकीय, प्रशासकीय आणि इतर व्यक्ती, संस्थांशी संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याझा अपघात झाला होता. त्यानंतर तो मलमपोडुर येथे मुन्शी म्हणून काम करत होता. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com