कारचालकाच्या मदतीला धावुन जाणाऱ्या पोलिसांवर रिक्षाचालकाचा हल्ला

चतुःशृंगी पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, रिक्षाचालकास अटक
crime news throwing stones at glass of car Beating rickshaw driver attack on Police pune
crime news throwing stones at glass of car Beating rickshaw driver attack on Police pune sakal

पुणे : रस्त्यावर थांबलेल्या कारच्या काचेवर दगड मारुन नुकसान करणाऱ्या रिक्षाचालकास जाब विचारणाऱ्या तरुणांना रिक्षाचालकाने मारहाण केली. त्यानंतर तरुणांच्या मदतीला धावणाऱ्या पोलिसांनाही मद्यपी रिक्षाचालकाने मारहाण करीत हल्ला केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, चतुःशृंगी पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली. हि घटना पाषाण येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अनिल प्रकाश सदाशिव (वय 32, रा. निम्हण आळी, पाषाण) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रय गेंगजे यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यासमवेत पाषाण परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते.

त्यावेळी पाषाण येथील रोनिता हॉटेलजवळ अस्लम अन्सारी व त्यांचे मित्र गणेश थोरात हे दोघेजण त्यांच्या कारजवळ थांबले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या मद्यपी रिक्षाचालकाने कारच्या मागील बाजुला दगड मारुन कारचे नुकसान केले. त्यावेळी दोघांनी रिक्षाचालक अनिल सदाशिव यास जाब विचारला. त्यावेळी त्याने दोघांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी गस्तीवर असणारे फिर्यादी गेंगजे व त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी रिक्षाचालकास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालक सदाशिव याने पोलिसांनाही शिवीगाळ करीन त्यांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्यास वाहनामध्ये बसवित असताना त्याने कारचा दरवाजा जोरात ओढला. त्यामध्ये पोलिस अधिकारी बसवराज माळी यांच्या उजव्या हाताची बोटे दरवाजात आल्याने त्यांच्या बोटांना जबर दुखापत झाली. रिक्षाचालकाने आरडाओरडा करीत त्यांनाही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com