बेकायदेशीररीत्या गर्भपातप्रकरणी पत्नी, सासरा, डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा

Crime
Crime

पिंपरी - मुलीच्या वडिलांनी जावयाला न सांगता बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी सासरा, पत्नी आणि संबंधित महिला डॉक्‍टरविरोधात गुन्हा दाखल झाला.

याबाबत मृणाल धोंडे घोरपडे (रा. नवी सांगवी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार सासरे सरोजकुमार पांडे (रा. नवी सांगवी), पत्नी अन्नपूर्णीमा घोरपडे (रा. नवी सांगवी, सध्या रा. उत्तर प्रदेश) आणि महिला डॉक्‍टर (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

अन्नपूर्णीमा सहा महिन्यांची गरोदर असताना वडील सरोजकुमार यांनी तिच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे कारण सांगून तिला घरी नेले. त्यानंतर डॉक्‍टरसोबत मिळून तिचा गर्भपात केला. अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावली. ही माहिती मृणाल यांच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली. गर्भपात केल्यानंतर मुलीला मूळगाव अलाहाबाद येथे नेले. हा प्रकार २८ जानेवारी २०१८ ते ९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com