Crime News : वेल्हे तालुक्यातील खून प्रकरणात आठ आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Pune Murder Case Land Dispute Eighth Accused Arrested

Crime News : वेल्हे तालुक्यातील खून प्रकरणात आठ आरोपींना अटक

वेल्हे : वेल्हे तालुक्यात नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय.३८) याचा वेल्ह्यात विसावा हॉटेल मध्ये सोमवार (ता.०६) रोजी गोळ्या झाडून तोंडावर धारधार शस्त्र (सत्तुर,चाकुने,कुकरी ) ने वार करून निघृण खुन केल्याची घटना घडली होती.

जमीन व्यवहारात हस्तक्षेप आणि एक वर्षांपूर्वी मुलाचा झालेल्या मृत्यूला नवनाथ हा जबाबदार असल्याच्या कारणवरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात पोलिसांनी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (वय ५६)रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे. सध्या रा. २२५,२२६, काळभोरवाडा, शुक्रवार पेठ, पुणे, आकाश कुमार शेटे, (वय २४), रा. १९१, शुक्रवार पेठ, पुणे, यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय.२२) रा.२०६, शुक्रवार पेठ, पुणे,

अक्षय गणेश साळुंखे (वय.२७) रा.१९१ , शुक्रवार पेठ, पुणे. शुभम राजेश थोरात, (वय.२१)वर्षे, रा.२१८, शुक्रवार पेठ, पुणे, मुळ रा. भालगुडी, ता. मुळशी, जि पुणे यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील पाबे. येथे राहणारा नवनाथ रेणूसे याचा खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांना बातमीरामार्फत माहिती मिळाली की,

आरोपी नामे माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे हा साथिदारासह किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले.

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याचे जमीनीचे व्यवहारात मृत नवनाथ ऊर्फ पप्पु नामदेव रेणुसे हा हस्तक्षेप करीत होता. तसेच माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षांपूर्वी मयत झाला होता. त्याच्या मृत्युस नवनाथ रेणुसे हाच जबाबदार असल्याचा समज त्याच्या मनात होता. यावरून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

हा गुन्हा करण्यापुर्वी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे यांनी त्यांची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय ४५), मुलगी पल्लवी भूषण येणपुरे ( वय ३० ), मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशीकांत शिंदे( वय २७ ) यांचेसह मिळून सदरचा गुन्हा करण्याचा कट तयार करून केलेल्या कटाप्रमाणे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

सर्व आरोपींना अटक करणेत आलेले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Pune Newspolicecrime