Tue, June 6, 2023

PMPML Bus : पीएमपी बसमधून महिलेचे दागिने लंपास
Published on : 6 March 2023, 11:51 am
पुणे : पीएमपी बसमधील एका महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यान रविवारी घडली.
याप्रकरणी एका महिलेने (वय ४५, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पीएमपी बसने कात्रज येथून हडपसरकडे प्रवास करीत होती.
रस्त्यात बसचा सीएनजी संपल्यामुळे काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी ही महिलाही बसमधून खाली उतरली. त्याचा फायदा घेत चोरट्याने या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. पुढील तपास पोलिस कर्मचारी जी. बी. क्षीरसागर करीत आहेत.