
Pune Crime News : धारधार शस्त्रे फिरवत दुकानाचे नुकसान
खडकवासला : धारधार शस्त्रे हातात घेवुन ते हवेत फिरवत आम्ही एरीयातले भाई आहोत, कोणी आमचे मध्ये आले तर खल्लास करुन टाकु. असे म्हणत दहशत करण्याचे प्रकार आता उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन पोचले आहे.
कोंढवे- धावडे खडकमाळ येथील किराणा मालाच्या दुकानासमोर ही घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी चंद्रकात दत्तात्रय सुतार (वय - ३०), सुरज अर्जुन गायकवाड (वय - २२), राहुल रमेश धोडगे (वय - २८), अर्थव मारुती यनपुरे (वय- १९), सर्वजण रा. न्यु कोपरे रोड, न्यु कोपरे, उत्तमनगर येथील आहेत. त्यांना अटक करण्यात आले आहे. यातील एक जण फरार आहे. याबाबतचा अधिक तपास उत्तमनगरचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहे.
सुतार व त्याच्या साथीदारांनी या दुकानासमोर येवुन, दुकानातील फ्रिजवर सिंमेटचे पेवर ब्लॉक मारुन, फ्रिजचे नुकसान केले. तसेच धारधार शस्त्रे हातात घेवुन ते हवेत फिरवत ‘आम्ही एरीयातले भाई आहोत, कोणी आमचे मध्ये आले तर खल्लास करुन टाकु.’ असे म्हणुन फिर्यादी यांना ‘दुकान बंद कर नाहीतर मारुन टाकेन’ अशी धमकी दिली आहे.
“धुलीवंदनाच्या दिवशी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या हि घटना घडली आहे. आरोपी दारु पिऊन दुचाकीवरून या परिसरात फिरत होते. त्यांच्या हातात हत्यार होती. त्यानंतर त्यांनी कोंढवे- धावडे येथील खडकमाळ वस्ती परिसरात जाऊन दुकानाचे नुकसान करीत दुकानदाराला धमकी देत दहशत पसरविण्याचा प्रकार केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.”
-सुनील जैतापूरकर, पोलिस निरीक्षक उत्तमनगर ठाणे