Sun, June 4, 2023

Crime News : प्रेमी युगलाला हकल्यामुळे रिक्षा चालकाचा खून
Published on : 19 March 2023, 2:25 pm
पिंपरी : पार्क केलेल्या ऑटो रिक्षामधील प्रेमी युगलाला हकल्यामुळे रिक्षा चालकाचा खून झाला. ही घटना दापोडीतील गणेश नगर येथे घडली. अलीम इस्माईल शेख (वय ४५, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. दापोडीतील गणेश नगर परिसरात एका रिक्षात प्रेमी युगुल बसलेले असताना शेख यांनी त्यांना हटकले.
याचा राग आल्याने त्यांच्यावर हल्ला करून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात चौकशी करून भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आणखी हल्लेखोरांचा समावेश आहे का, याचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या आहेत. अधिक तपास सुरु आहे.