संत ज्ञानेश्‍वरनगरच्या झोपड्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुनर्वसन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचा ‘एसआरए’चा प्रयत्न
पुणे - एरंडवण्यातील संत ज्ञानेश्‍वरनगर झोपडपट्टीच्या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प साकारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे (एसआरए) शुक्रवारी येथील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. प्रारंभी काही झोपडीधारक व अपात्र नागरिकांचे ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांशी वाद झाल्याने तणावपूर्ण वातावरणात कारवाईची प्रक्रिया पार पडली.

ज्ञानेश्‍वरनगर झोपडपट्टीच्या ठिकाणी ‘स्पायर ग्रेस व्हेंचर’तर्फे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेत अपात्र ठरलेल्या १५ झोपडीधारकांनी याविषयी न्यायालयात दाद मागितली होती. तसेच संबंधित योजना चुकीच्या पद्धतीने राबविली जात असल्याचा आरोप स्थानिक राजकीय कार्यकर्ते व अन्य नागरिकांकडून केला जात होता. याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर ‘एसआरए’च्या तहसीलदार व सक्षम प्राधिकारी गीता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच तहसीलदार राधिका बारटक्के, कनिष्ठ अभियंता प्रमोद जतकर यांच्या पथकाने या कारवाईला सुरवात केली.

दरम्यान, अपात्र झोपडीधारकांनी कारवाईवेळी तीव्र विरोध दर्शविल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. गायकवाड यांनी विरोध करणाऱ्या झोपडीधारकांची बाजू ऐकून घेत त्यांची समजूत काढली, त्यानंतर कारवाई पूर्ण झाली. पात्र झोपडीधारकांना राजेंद्रनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 

‘एसआरए’चे प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी आधी जागा मोकळी करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने प्रशासन कार्यवाही करत आहे.
- गीता गायकवाड, तहसीलदार, एसआरए

Web Title: crime on sant dnyaneshwar slum