निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल होऊ नयेत : डॉ. कोल्हे

dr amol kolhe
dr amol kolhe

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही राजकीय व्यक्तीवर राजकीय द्वेषातून व सुड भावनेतून गुन्हा दाखल होऊ नये, तसेच अशा प्रकारांना आपण सर्वांनीच विरोध केला पाहिजे, अशी भावना शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

वाघोली येथे कार्यशाळेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ते पुढे म्हणाले, 'जुलै-ऑगस्टमध्ये घडलेल्या घटनेबाबत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा तसेच त्यांना नाकारलेला जामीन ही आपल्या दृष्टिने धक्कादायक बाब असल्याचे सांगताना या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिलात नक्कीच न्याय मिळेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु, ज्यांचे नाव आपण सर्वजण सतत घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनीही सत्ता असताना सत्तेचा कधीच गैरवापर केला नाही, असाही टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला.'

'राजकीय आरोपाची बातमी पहिल्या पानावर ठळक मथळयात येते, तशीच बातमी ते आरोप निराधार ठरल्यावरही आली पाहीजे. कारण सत्य बातमीमुळे परस्परांमधील विश्वास टिकून राहतो. समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांच्या भुमिकेला तसेच विधायक बातम्याना अत्यंत महत्व आहे. लग्न समारंभासारख्या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिंधीच्या सकाळ ते रात्रीपर्यंतच्या जनसंपर्कातून नेमके काय साध्य होते, असाही सवाल करून त्यांनी यावेळी समाजाच्या सुख दुःखात औपचारीकपणे नव्हे, तर मनाने सहभागी व्हायला हवे,' असेही मत मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com