विद्यार्थिनीला अश्लील‌ मेसेज : ट्युशनच्या नावाखाली बिहारी शिक्षकाचा प्रताप

Crime story  teacher sending vulgar message to student
Crime story teacher sending vulgar message to student

पुणे - घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीस अश्‍लील मेसेज पाठवून तिला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षकास बेड्या ठोकल्या.

संदीप कुमार (वय ३५, रा. पोरवाल रस्ता, लोहगाव, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी सध्या बीसीएचे शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी बारावीला असताना तिला भौतिकशास्त्र हा विषय शिकविण्यासाठी तिच्या पालकांनी अभियंता असलेल्या संदीप कुमार या शिक्षकास निवडले होते. त्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून तिला लग्नाची मागणी घातली होती. अनेक दिवस शिक्षकाकडून विद्यार्थिनीस त्रास दिला जात होता. अखेर या प्रकारास कंटाळून विद्यार्थिनीने आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्याची हकालपट्टी केली. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून त्याने विद्यार्थिनीसह तिच्या पालकांच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठविण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पानटपरीचालकाच्या मोबाईलवरून पाठविले मेसेज 
आरोपी संदीप कुमार याने आपण पोलिसांना सापडू नये, यासाठी त्याच्या घराजवळील एका पानटपरीचालकाशी ओळख वाढविली. पानटपरीचालकाचा मोबाईल घेऊन त्याद्वारे तो विद्यार्थिनी व तिच्या पालकांना मेसेज पाठवत होता. दरम्यान, पानटपरीचालकास त्याचा संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com